पंढरपूर चंद्रभागा नदीमध्ये जालना जिल्ह्यातील 2 महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू तर एक महिला गेली वाहून.
चंद्रभागा नदी पात्रात आपत्ती व्यवस्थापन टीमअसती तर
पंढरपूर चंद्रभागा नदीमध्ये जालना जिल्ह्यातील 2 महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू तर एक महिला गेली वाहून.
शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कागदावर. भाविक संतप्त.
चंद्रभागा नदी पात्रात आपत्ती व्यवस्थापन टीमअसती तर महिलांचा जीव वाचला असता स्थानिक व भाविकांची प्रतिक्रिया.
आज शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी सकाळी पंढरपूर चंद्रभागा नदीपात्रावर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील महिला पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत आले होते. सदर महिला चंद्रभागेवर स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी जाणार होते परंतु चंद्रभागा नदीपात्रा स्नानासाठी चंद्रभागा नदीपात्रात उतरले असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तिघीपैकी दोन महिला मृत्यू अवस्थेत सापडल्या तर एक महिला वाहून गेली असल्याचे प्रथमदर्शी असणारे भाविक सांगत आहेत.
आषाढी यात्रे अगोदर पंढरपूर चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाच ते सहा भाविक वाहून गेल्याची घटना घडली होती त्यावेळी आमच्या साई सम्राट प्रसिद्धी माध्यमाद्वारे पंढरपूरची आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था कागदावरच या सदराखाली मथळा छापला होता. तसेच आपत्ती व्यवस्थापन चे प्रमुख ढोले साहेब यांच्याशी संपर्क साधून आपण सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून स्थानिक नागरिकांची व भाविकांची आपत्ती व्यवस्थापन टीम करावी किमान पावसाळा संपेपर्यंत म्हणजेच सहा महिन्यासाठी करावी असे संभाषण मोबाईल द्वारे करण्यात आले होते त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख मी जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून पंढरपूर चंद्रभागा नदी पात्रात आपत्ती व्यवस्थापन या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतो असेही सांगितले होते.
पंढरपूर आषाढी यात्रा दरम्यान सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी यात्रा नियोजन व काही सूचना संदर्भात पत्रकार असावेत बैठक घेतली होती त्यावेळी दैनिक कर्मयोगीचे व साप्ताहिक सम्राटचे संपादक हरिभाऊ प्रक्षाळे यांनी आपत्ती व्यवस्थापन संदर्भात बैठकीमध्ये मुद्दा उपस्थित करून आपत्ती व्यवस्थापन टीम वाढवून पावसाळा संपेपर्यंत म्हणजेच सप्टेंबर अखेरपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाची टीम चंद्रभागा नदी पात्रात तैण्यात करण्यात यावी असे जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी बैठकीमध्ये बोलताना सांगितले होते. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सध्या आषाढी यात्रे करता आपत्ती व्यवस्थापन व खाजगी लोक घेऊन टीम ठेवण्यात आल्या आहेत असे सांगून आपल्या सूचनेचा यापुढे विचार करू असे सांगितले होते. परंतु आज आपत्ती व्यवस्थापनाची टीम जर चंद्रभागा नदी पात्रात असतील तर या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मृत्यू झालेल्या महिलांचे नाव संगीता सपकाळ व सुनिता सपकाळ या महिलांना जीव गमवावा लागला नसता हे मात्र नक्की आहे. यानंतर तरी जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष घालून आपत्ती व्यवस्थापन किमान पावसाळा होईपर्यंत सहा महिन्यासाठी तरी चंद्रभागा नदी पात्रात ठेवावी अशी पंढरीत येणाऱ्या भाविक व स्थानिक नागरिकांची मागणी होत आहे.



